अभिनेत्री रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली. या चित्रपटातील तिच्या ‘आर्ची’ नावाच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘सैराट’ या मराठी चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर रिंकूने हिंदी चित्रपटात देखील काम केले. सध्या रिंकु सोशल मीडियावर देखील सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच तिने केदारनाथ मंदिराला भेट दिली आहे.
रिंकू राजगुरुने केदारनाथ मंदिराबाहेर फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये रिंकूने डोक्याला भस्म लावलेले आहे. तर अंगावर शाल घेतली आहे. रिंकूने हे फोटो पोस्ट करत ‘हर हर महादेव’ असे कॅप्शन दिले आहे. त्यापूर्वी रिंकूने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिचा पहिला ट्रेक करत असल्याचे सांगितले होते. मात्र यावेळी तिने ती नेमकी कुठे आहे? याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर तिने केदारनाथ मंदिराबाहेर फोटो शेअर केले असून ती दर्शनासाठी तिथे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीचे रिंकूच्या इनस्टाग्रामवर सर्व पोस्ट डिलीट झाल्या होत्या. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तिच्या सर्व पोस्ट डिलीट झाल्याचे तिने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता ती पुन्हा इनस्टाग्रामवर परतली असून चाहत्यांसोबत तिचे अपडेट शेअर करत आहेत.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, रिंकूने ‘कागर’, ‘झुंड’, ‘रंग प्रेमाचा’ या चित्रपटात काम केले. लवकरच ती ‘खिल्लार’ चित्रपटात दिसणार आहे. रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी 2024मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.