बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्तीयांचा आज जन्मदिवस. 16 जून 1952 रोजी जन्मलेल्या मिथुन दा यांचे खरे नाव फार कमी लोकांना ठाऊक असेल. होय, गौरांग चक्रवर्ती हे त्यांचे खरे नाव.
त्यांनी आज वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे मिथुन चक्रवर्ती याला प्रचंड धक्का बसला आहे. गुणी अभिनेत्याच्या अकाली जाण्यामुळे वाढदिवस साजरा करणं योग्य ठरणार नाही असा विचार मनात आल्याने मिथुनने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
मिथुन याने वाढदिवस साजरा न करण्यामागे कोरोना विषाणूने घातलेले थैमान हे देखील एक कारण आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांचा वाढदिवस कोरोना काळात व्हर्च्युअल पार्टी आयोजित करून साजरा करत असताना मिथुनने मात्र असं काहीही न करण्याचं ठरवलं आहे. या दोन कारणांमुळे माझ्या वडिलांनी वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवल्याचे मिथुन चक्रवर्तीचा मुलगा नमाक्षी याने म्हटलंय.
दरम्यान, एकेकाळी बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण रिल लाईफपेक्षा त्यांची रिअल लाईफ अधिक चर्चेत राहिली.श्रीदेवी आणि मिथुन यांच्या लव्ह लाईफचे किस्से सगळ्यांनाच ठाऊक आहेत. मिथुन यांनी श्रीदेवींशी गुपचूप लग्न केले होते, असे म्हटले जाते.
View this post on Instagram
मिथुनदांच्या पत्नी योगिता बाली यांच्याविषयी आपण सगळेच जाणतो. 1979 मध्ये मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. आजही दोघे सोबत आहेत. पण योगिता बाली यांच्याआधी मिथुन यांची पहिली पत्नीही होती. तिचे नाव आहे हेलेना ल्यूक.
View this post on Instagram
चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अंगी असलेले अभिनयाचे रंग प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले. मिथुनदा यांनी अनेक पात्र चोखपणे निभावल्या अशा या ‘डिस्को डान्सर’ बहुआयामी कलाकाराला 68व्या वाढदिवसानिमित्त दैनिक प्रभात कडून हार्दिक शुभेच्छा!