अतिट (वार्ताहर) – येथील वडगाव ते अतिट रस्त्याच्या डांबरीकरण झाल्यानंतर एक वर्षाच्या आत रस्त्याची दुरवस्था झाली असून यामुळे परिसरातील वाहनधारक व नागरिाकांमधून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हा रस्ता प्रामुख्याने केसुर्डी एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये काम करणार्या कामगारांना उपयुक्त असणारा रस्ता आहे. एक वर्षापूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी आ. मकरंद पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती.
त्यावेळी आ. पाटील यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ 89 लाख रुपये इतका निधी मंजूर केला होता. यामध्ये जी 2, एम. पी. एम, करपेट, सिलिकोटसह, साईड पट्टी भरणे व गटर खुदाई इत्यादी कामाचा समावेश होता.
त्यावेळी रस्त्याचे कामही झाले. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणा व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने एक वर्षात या रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणार्या कष्टकरी कामगारांना तसेच वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी करुन ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता करुन घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.