लोकांच्या समस्यांमध्ये भर घालणारी इंधन दरवाढ परत घ्यावी- सोनिया गांधी

नवी दिल्ली : करोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेलेली असताना पेट्रोल डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच मुद्यावरून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. इंधन दरवाढीचा निर्णय असंवेदनशील असल्याचे सांगत महामारीच्या काळात लोकांच्या समस्यांमध्ये भर घालणारी इंधन दरवाढ परत घ्यावी, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.


काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पात्रात, केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून २ लाख ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांनी आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा पंतप्रधान व्यक्त करत असताना अशा संकटात लोकांवर आर्थिक भार लादणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच सध्याच्या करोना महामारी विरोधातील लढाईच्या काळात देशाला आरोग्या संबंधी तसेच आर्थिक व सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मला या गोष्टी खंत वाटते की, अशा संकटाच्या काळात सरकारनं पेट्रोल व डिझेलचे दर वाढवण्याचा असंवेदशील निर्णय घेतला, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

देशातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे. छोटे, मध्यम व मोठे उद्योग बंद होऊ लागले आहे. शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कारण कळत नाही. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत ९ टक्क्यांची घट झाली आहे. तरीही सरकार संकटाच्या काळात लोकांना याचा लाभ देण्यासाठी काही करत नाहीये, असा दावा गांधी यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.