चित्रपटसृष्टीपासून लांब गेलेली मात्र एकेकाळी अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री करिश्मा कपूर ऊर्फ लोलोचा 47 वा वाढदिवस 25 जून रोजी साजरा झाला. करिश्माची छोटी बहीण अभिनेत्री करिना कपूर ऊर्फ बेबो हिने एक व्हिडिओ शेअर करत वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओसोबत लोलोसाठी छोटासा सुंदर संदेश आहे.
पोस्टमध्ये करिनाने लिहिते, “सर्वात बहादूर, खंबीर आणि मौल्यवान आहेस तू. माझी बहीण माझी बेस्ट फ्रेंड, माझी दुसरी आई आणि आमच्या कुटुंबाची केंद्रबिंदू आहेस तू. तुझ्यासोबत चायनीज फूड खाताना त्याचा स्वाद अधिकच वाढतो.
मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कधी कधी मी विचार करते की मोठी बहीण कोण आहे आणि ती तू आहेस ही सर्वांत चांगली गोष्ट आहे. माझी लोलो.’ करिनाच्या या पोस्टला उत्तर देताना करिश्माने लिहिले की, “हे खूप आवडलं. धन्यवाद बेबी सिस्टर.’
करिनाच्या या व्हिडिओमध्ये करिश्मा करिनाचे लहानपणापासून आतापर्यंतचे फोटोज आहेत. करिनाची फ्रेंड अमृता अरोराने एक फोटो पोस्ट करत करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.