मुंबई – लहानपणी कार्टून्सच्या मध्यातून आपल्या मनावर अधिराज्य गाजवणारे एव्हरग्रीन नाव म्हणजे, मिस्टर बीन (Mr. Bean) रोवन अॅटकिंसन या अवलियाच्या अनेक भन्नाट कॉमेडी रिसीज कमालीच्या हिट झाल्या आहेत.
एक शब्दही न उच्चारता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पोट धरून खळखळून हसायला लावणारे मिस्टर बीन यांचा आज वाढदिवस आहे. मिस्टर बीनचा मिश्किल अंदाज, टेडी सोबतची केमिस्ट्री, एकटे पण आनंदी जगणे हे अनेकांसाठी आजही एखाद्या थेरपी प्रमाणे काम करतात.
दरम्यान, मिस्टर बिन यांनी आपल्या कारकीर्दीत ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सिरिज मध्ये ‘तसेच 1987 मध्ये ‘बीबीसी रेडिओ 3’ या वाहिनीवर त्यांचा ‘द अॅटकिंसन पिपल’ या विनोदी सीरीज मधून प्रेक्षकांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मोठी यशाची शिखरे गाठली.