“मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो!”

आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जळजळीत टीका

मुंबई –  महापालिकेची निवडणूक २०२२ रोजी होणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी शिवसेनेनेही जोरदार तयारी सुरु आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा गुजराती बांधवांना साद घातली आहे.   तर त्यांच्या या घोषवाक्याला ट्विटद्वारे उत्तर देत  भाजप नेते आशिष शेलार यांनी   जळजळीत टीका केली आहे.

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’

 

आशिष शेलार ट्विट केले आहे की,’सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध आले. अजून निवडणूक बाकी आहेच.. कोकण म्हणजे आम्हीच..अशा अहंकारी पक्षाचे “वस्त्रहरण” सुरु झाले रे महाराजा!
आता मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो!’ असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.