पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यातच आज (दि. १६) राज ठाकरे हनुमान जयंतीला पुण्यात असतील. यावेळी पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वीच राज ठाकरेंचं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. हनुमान जयंती निमित्त राज ठाकरेंनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. “देशभरातील तमाम हिंदू बांधवांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.!’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
देशभरातील तमाम हिंदू बांधवांना
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!#हनुमान_जयंती #HanumanJayanti pic.twitter.com/beRkxKxnJV— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2022
आज संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरेंच्या हस्ते खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती होणार, असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. महत्वाचं म्हणजे या सोहळ्याचे एक पोस्टर चांगलेच चर्चेत राहिले असून, यावर राज ठाकरेंचा “हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत.