मराठी चित्रपटसृष्टीतील आणि छोटया पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या दमदार अभिनयाने असंख्य चाहत्यांमध्ये स्वःतची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.
View this post on Instagram
प्राजक्ताने नुकतेच एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘बाई गं…
कस करमत न्हाई गं…
बाण उरी बसला…
कृष्णसखा दिसला…
बाई बाई बाई गं… ♥️
प्रेमात पडले या गाण्याच्या…
ऐका.. आजच release झालय… 🥰.’ असे कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
हे कॅप्शन देत तिने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील गाण्याचे प्रोमोशन केले आहे. या फोटोंवर असंख्य चाहत्यांच्या कमेंटस् येत आहेत. तसेच लाइक्सचा अक्षरशः पाउस पडत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री प्राजक्ता माळी वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास “टॅलेंट हंट शो’मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ टीव्हीवरच नाही तर चित्रपटांद्वारेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.