पुणे : अनधिकृत बांधकामे आणि वृक्षतोडीमुळे शहरातील टेकड्यांची लचकेतोड सुरू असतानाच टेकडया वाचविण्याची जबाबदारी असलेली महापालिका रस्ते तोडून पुन्हा टेकडीचे लचके तोडून पुणेकरांच्या भविष्या सोबत खेळत असल्याची टीका करत वेताळ टेकडीवरील बालभारती ते पौड फाटा रस्त्याला युवकांनी पथनाटयां द्वारे विरोध दर्शविला.
डेक्कन येथील कलाकार कट्टा येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस, स्वतंत्र थेटर आणि लोकायत यांच्या सयुंक्त विद्यमानाने झाडांना उलटे रोप लावून त्यांना फाशी देण्याचा अनोखा देखावा सादर करून हा निषेध व्यक्त करण्यात आले.
पुणेकरांनो मला वाचवा, “वेताळ टेकडी आपल्याला आवाज देतेय” या नावाचे पोस्टर्स त्यावर लावण्यात आले होते. प्रदेश युवक कॉंग्रेस चे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या पथनाटयांचे आयोजन केले होते. शहर कॉंगेसच्या पदाधिकाऱ्यांसह अभिजीत चौधरी, धनश्री हेबळीकर, स्वप्निल पुसे, सौरभ आमराळे, गणेश गुगळे, पुनमीत तिवारी ,आनंद खन्ना ,भुषण जैनरूशल हिना उपस्थित होते.