पुणे – कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सगळ्यांचेच जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवले आहे. अशावेळी कोविड १९ चा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर, कुणीही बाहेर न पडता घरातच राहावे हाच एक मार्ग! अशावेळी जे रोज काम करतील तरच त्यांना दोन वेळचे जेवण मिळेल अशा मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना, ते राज्यातील असो की परराज्यातील त्यांच्या जीवनापुढे खरे आव्हान उभे ठाकले आहे. अशावेळी एक आशेचा किरण बनून त्यांना मदत करायला आला तो आजचा युवा वर्ग!
दि. ११ एप्रिल २०२० रोजी, सिंहगड रोड, नऱ्हे , धायरी गाव, आंबेगाव, कोद्रे वस्ती, दत्तनगर आणि कात्रज येथे सहायक पोलिस निरीक्षक सतिश उमरे आणि भारती विद्यापीठ पुलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांच्या हस्ते रोजच्या जीवनावश्यक असलेल्या अन्नधान्याचे एकूण १५० किट वितरित करण्यात आले.
यावेळी या युवा वर्गाला मोलाचे सहकार्य लाभले ते सिंहगड पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहायक पोलिस निरीक्षक सतिश उमरे, संदीप सांगळे, विष्णु कुमकर, दीपक शेंडे तुषार किंद्रे आणि भारती विद्यापीठ पुलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व आबा मोकाशे यांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने एकूण १५० कुटुंबांना एक महिन्याचे रेशन यामध्ये तांदूळ, मसूर डाळ, तेल, मिरची पावडर, मीठ, गहू व अंगाचे व कपड्याचे साबण देण्यात आले.
यामध्ये मुथ्थूट ग्रुप, रिजनल ऑफिस, पुणे आणि मित्र परिवारने आर्थिक मदतीसाठी खारीचा वाटा उचलला. यावेळी मुथ्थूट ग्रुप कडून आनंद नफाडे, किरण सातपुते, ललित मलविया, श्रीकांत मोरे उपस्थित होते.
यावेळी या युवा वर्गात सामाजिक कार्य करणारे रिता शेटीया आणि ईश्वर बजाज यांच्या बरोबर श्वेता बजाज, वैभवी राठी, गोपालजी राठी, अक्षय उराडे, संतोष सुरवसे, शाहनवाज भोले, अझहर खादिम, धनंजय गोरे, सुनील असवी आणि प्रभुणे काका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.