पुणे-शहरातील करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा कमी होण्यास काही अंशी सुरूवात झाली आहे. पण, हडपसर-मुंढवा आणि धनकवडी हद्दीत करोना नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील बाधितांचा एकूण आकडा 7,598,तर धनकवडी-सहकारनगरमध्ये ही संख्या 7 हजार 05 वर गेली आहे.
शहरात करोनाचे नवीन बाधित या भागातच सर्वाधिक प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. मार्चपासून शहराच्या मध्यवर्ती भागात करोना बाधित सर्वाधिक होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उपनगरांमध्ये करोना बाधित वाढण्यास सुरूवात झाली आहे.
विशेष: जुलैमध्ये उपनगरांमध्ये ही साथ फोफावली आहे. त्यात,आता हडपसर आणि धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक बाधित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय असून येथे सुमारे 6,669 बाधित झाले आहेत.
सध्या कोथरूड-बावधन-4940, भवानी पेठ-4,229, शिवाजीनगर-घोले रस्ता-3,618, वानवडी-रामटेकडी 3,590, कोंढवा-येवलेवडी-3,524 तर औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय 3 हजार 206 एकूण करोनाबाधित आहेत. ही संख्या रोखण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
पाच हजारांवर करोनाबाधित असलेले परिसर
सिंहगड रस्ता-5,533
वारजे- कर्वेनगर-5,533
नगर रस्ता-5,350
ढोले-पाटील-5,130
बिववेवाडी-5,121
येरवडा-कळस-धानोरी-5016