पुणे – गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित २२व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत अस्पायर एफसी, उत्कर्ष क्रिडा मंच(यूकेएम) एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात तनया गायकवाड(१० मि.), समृद्धी काटकोले(२९ मि.)यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर अस्पायर एफसी संघाने क्रीडा प्रबोधिनी एफसी संघाचा २-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात भार्गवी बेलोसे(१५,३४, ५० मि.) हिने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर यूकेएम एफसी संघाने सिग्मय एफसी संघाचा ३-० असा एकतर्फी पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.
जुनियर डिव्हिजन गटात उपांत्यपूर्व फेरीत दुर्गा एफसी संघाने साई एफसी संघाचा २-० असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून रॉनी रोझारिओ(३९मि.), नीरज माने(५९मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
Guru Tegh Bahadur Gold Cup : उत्कर्ष क्रीडा मंच अ, अशोका एफसी संघांची आगेकूच…
सुपर डिव्हिजन गटात जीओजी एफसी संघाने ब्लु स्टॅग एफसी संघाचा ५-१ असा पराभव करून आगेकूच केली. जीओजी एफसीकडून प्रकाश थोरात(३७, ४८मि.,)याने दोन गोल, सुमित काटे(१६मि.), ईश्वर क्षीरसागर(३४मि.), सुमित भंडारी(५५मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. ब्लू स्टॅग एफसीकडून शिवम तिवारी(३५मि.)याने एक गोल केला.