राजकोट : गुजरातमधील राजकोट येथे एका 19 वर्षीय दलित तरूणीचा बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यासह तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमित पडालिया, शांती पडालीया आणि विपुल शेखदा अशी आरोपींची नावे आहेत.
अमित पडालिया हा भाजपा नेता असून त्याची आई ही गावची सरपंच आहे. तो भाजपाचा कोतदासंगनी तालुका सरचिटणीस आहे. या तीन आरोपींनी या युवतीचे घरातून अपहरण केले. तिच्यावर मोटारीत बलात्कार केला. नंतर तिला तिच्या घराजवळ टाकून ते पसार झाले, असे तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे.
या तिघांविरूध्द एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यात अद्याप कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नाही. मात्र या आरोपींना अटक केली नाही,असे राजकोट जिल्हा पोलिस अधीक्षक बलराम मीना यांनी सांगितले.