सामाजिक उपक्रमांची रेलचेल
सविंदणे : माणिकचंद उद्योग समूहाचे जगप्रसिद्ध उद्योगपती, शिरूर नगरीचे दिवंगत नेते (स्व) रसिकलालजी धारीवाल यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त शिरूर शहरवासियांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
शिरूर शहरातील रसिकलाल धारीवाल यांच्या आर्शिवाद या निवासस्थानी झालेल्या अभिवादन कार्यक्रमास माणिकचंद उद्योग समुहाचे उद्योजक व शिरूर शहर विकास आघाडीचे प्रमुख, नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल, शहर विकास आघाडीचे जेष्ठ नेते प्रभाकर डेरे, रयत शिक्षण संस्थेचे संचालक जाकीर खान पठाण, शिरुर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी सभापती व संचालक शरद कालेवार, अदित्य पतसंस्थेचे चेअरमन विनोद धाडीवाल, उद्योजक सुभाष गांधी, प्रकाश बाफना, भरत कालेवार, दादाभाऊ वाखारे, किरण पठारे, दीपक तातेड, मयुर नहार शिवसेवा मंडळ ट्रस्टचे मनसुखलाल गुगळे,
ज्ञानेश्वर घावटे, नगरपरिषद माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप करंजुले, नगरपरिषद शिक्षण मंडळ माजी सभापती संतोष शितोळे, तुकाराम खोले, प्रशांत शिंदे, माजी राष्ट्रवादी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, विठ्ठल पवार, निलेश लटांबळे, अभिजीत पाचर्णे, संजय देशमुख, विनोद भालेराव, सचिन धाडीवाल, अबिद शेख, अशोक पवार, सुशांत कुटे, मयुर थोरात, रंजन झांबरे, राहिल शेख, सागर पांढरकामे, निलेश पवार, सागर नरवडे, निलेश कोळपकर, रवी गोसावी आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.
धारीवाल कुटुंबाकडून परंपरा कायम
दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त शहरातील विविध भागात जाऊन सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांना मिठाई देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची धारीवाल कुटुंबीयांची परंपरा स्व. रसिकलाल धारीवाल यांचे सुपुत्र नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल व नातू अदित्य धारीवाल यांनी त्यांच्या मागेही निरंतर सुरू ठेवली आहे. शहरातील झोपडपट्टीवासियांना तसेच सर्टिफाईड हायस्कूल व परिसरातील अनाथाश्रम येथे प्रकाश धारीवाल यांनी मिठाई वाटप करून वंचित घटकांचा आनंद द्विगुणीत केला.