जळोची – जागतिक कीर्तीचे थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर ‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. शासकीय नियमाचे पालन करून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत साळवे नगर, कसबा या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी घरोघरी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, रिपाई जिल्हा सचिव सुनील शिंदे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष साधू बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते धनंजय तेलंगे, उमेश शिंदे, गणेश शिंदे, रिपाई संपर्कप्रमुख निलेश जाधव, लहुजी शक्तीसेना पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, झोपडपट्टी सुरक्षा दल जिल्हाध्यक्ष बापू शेंडगे, संपादक दशरथ मांढरे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे राज्य संपर्क प्रमुख सोमनाथ पाटोळे,अँड.अमृत नेटके, अमोल इंगळे, केदार पाटोळे, विजय नेटके, विक्रम लांडगे, रिपाई शहराध्यक्ष संजय वाघमारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला.