महापालिकेचे क्रांतिवीरांना अभिवादन

पिंपरी – भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधूच्या पुतळ्यास, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

चिंचवडगाव येथे झालेल्या कार्यक्रमास अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, “ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, विधी समिती सभापती अश्‍विनी बोबडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.