पिंपरी – विवाहितेला पती व अन्य एका महिलेने बंदुकीच्या लाकडी मुठीने मारहाण केली. ही घटना संत तुकारामनगर येथे गुरुवारी (दि. 8) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी नीलिमा प्रमोद घाडगे (वय 40, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे पती प्रमोद छगनराव घाडगे (वय 45, रा. महेशनगर, पिंपरी) व पूजा प्रकाश वायचळ (वय 42, रा. महेशनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलिमा यांचा पती प्रमोद घाडगे पिंपरीतील संत तुकारामनगर येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गाडीमध्ये पूजा वायचळ हिच्याशी बोलत होता. त्यावरुन विचारणा केली असता प्रमोद व पूजाने नीलिमा यांना मारत जखमी केले.