सिंबायोसिस येथे प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राफॉलॉजीचा वापर

हस्ताक्षराद्वारे व्यक्तीच्या अंतरंगात डोकावण्याचा दृष्टीकोन

पुणे – कोविड १९ मुळे जवळजवळ सर्वचं बी स्कूल्स ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेत आहेत. सिंबायोसिस इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट पुणे (एसआयबीएम) येथे देखील ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करून सर्व प्रकाच्या एमबीए अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सिंबायोसिस नॅशनल एप्टीट्यूड (एसएनएपी) मध्ये सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा दिली व ज्यामधून एसआयबीएम पुणेच्या प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्प्यासाठी ४००० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करुन सर्व बाबींसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करत असताना निवड प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणण्यासाठी एसआयबीएम पुणे ने “ग्राफोलॉजी/ हस्ताक्षर विश्लेषण” या संकल्पनेचा चा उपयोग केला. ग्राफॉलॉजी किंवा हस्ताक्षर विश्लेषण याचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या हस्तलेखन नमुन्याचा अभ्यास करून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे विशिष्ट पैलू तसेच वागणूक जाणून घेता येऊ शकते.

“हस्ताक्षर विश्लेषण” हे त्या विद्यार्थ्यांच्या मनाचे सर्वेक्षण करून तो विद्यार्थी प्रवेशासाठी/ नोकरीसाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरवता येते. वरकरणी एखाद्या कमकुवत किंवा बेशिस्त वाटणाऱ्या विद्यार्थांच्या अंतरंगात एक उत्साही, गतिशील व्यक्तिमत्व लपलेले असू शकते. अश्याप्रकारे विश्लेषण करण्यासाठी एसआयबीएम पुणे, येथे कु. अम्या मदन यांनी ECRIVONS नावाच्या एका स्टार्टअप ची स्थापना केली. हस्ताक्षर विश्लेषण हे या स्टार्टअप प्रमुख काम असून हस्ताक्षराद्वारे व्यक्तीच्या अंतरंगात डोकावण्याचा दृष्टीकोन येथे पाहावयास मिळतो.

ईश इन्फॉर्मशन सिस्टिमस प्रा लिमिटेड ही चेन्नईस्थित सॉफ्टवेर कंपनी शैक्षणीक संसथाना तंत्रज्ञान पुरविते ज्याद्वारे व्यवसायिक बदल, ग्राहकता इत्यादींचा अभ्यास करता येऊ शकतो.या कंपनीने मुलाखतकारांसमोर ECRIVONS ने दिलेल्या विश्लेषणाचे आलेखन मांडण्याचे काम केले.

आज हस्तलेखन विश्लेषणाचा वापर करून अनेक कंपन्या/ संस्थामध्ये मध्यम व उच्च व्यवस्थापनाच्या नोकऱ्यांसाठी पदभरती होताना दिसते. एसआयबीएम पुणे येथे देखील या पद्धतीचा वापर करून विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेचा एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.