पुणे : ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवरायांचे नाव पडले होते अशा जुन्नरच्या शिवाई देवीची नित्यनेमाने सेवा करणाऱ्या भामाबाई ताजणे… वय झालं मणक्याचा त्रास असला तरी भामाबाई नित्यनेमाने शिवनेरी गडावरच्या पायऱ्या चढून जात शिवाई आईची सेवा करतात. एवढेच काय मणक्याचा त्रास असताना तुम्ही सगळे कसेकाय करता ? असा प्रश्न विचारल्यावर ” आता वय झालयं… ! ” असं त्या हसून सांगतात. भामाबाईंच्या याच ऊर्जेने खासदार अमोल कोल्हे देखील प्रभावित झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी या आजींची फोनवरून विचारपूस केली. आजींच्या लेखाचेही कौतुक केले आहे. एवढेच नाही तर या आजींच्या मणक्याच्या उपचारासंबंधी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही कोल्हे यांनी दिले आहे.
ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवरायांचं नामकरण करण्यात आलं त्या आई शिवाईची रोज सेवा करणाऱ्या भामाबाईंना फोन करून मणक्याच्या त्रासाबद्दल विचारपूस केली तर 'आता वय झालंय' म्हणत त्यांनी चक्क हसून उत्तर दिलं!त्यांची सकारात्मकता मला ऊर्जा देऊन गेली.त्यांना मी सर्वतोपरी मदत करणार आहे. pic.twitter.com/FDACMEFNAU
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 13, 2022
खासदार अमोल कोल्हे यांनी भामाबाई यांच्यासोबत संवाद साधल्याचे ऑडिओ क्लिप आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की , “ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवरायांचं नामकरण करण्यात आलं त्या आई शिवाईची रोज सेवा करणाऱ्या भामाबाईंना फोन करून मणक्याच्या त्रासाबद्दल विचारपूस केली तर ‘आता वय झालंय’ म्हणत त्यांनी चक्क हसून उत्तर दिलं!त्यांची सकारात्मकता मला ऊर्जा देऊन गेली.त्यांना मी सर्वतोपरी मदत करणार आहे”.