शिक्रापूर- टाकळी भीमा (ता. शिरूर) येथे एका नातवानेच त्याच्या चुलत आजीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नराधम नातवावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. टाकळी भीमा येथील पीडित महिला व आरोपी नात्याने आजी व नातू आहेत.
महिला ही घरात असताना तिचा नातू असलेला आरोपी हा महिलेला मला घरातील फळीवर डबा काढून द्या, असे म्हणून आजीला घरात बोलावले. यावेळी घरात कोणी नसताना त्याने आजीला जबरदस्ती करीत आजीवर बलात्कार केला.
यावेळी महिला आरडाओरडा करू लागली असताना तुझ्या मुलाला मारून टाकील, अशी धमकी दिली. यावेळी या महिलेचा आवाज ऐकल्याने तिची मुलगी त्याठिकाणी आली. त्यानंतर आरोपी हा तेथून पळून गेला. मात्र,
त्यानंतर देखील तो दररोज आजीकडे रागाने पाहू लागला. घडलेल्या प्रकाराबाबत महिलेने तिच्या नातेवाईकांशी चर्चा करीत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपी असलेल्या नातवावर गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक सागर कोंढाळकर करीत आहेत.