‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, आणि … नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंवर पुन्हा हल्ला

रत्नागिरी – ‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ असा जोरदार हल्ला केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. राणे यांनी आपल्या ‘प्रहार’ वर्तमानपत्रामधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधला आहे.

‘हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा’ अशा मथळ्याखाली नारायण राणेंचा घणाघाती प्रहार वाचा उद्याच्या अंकात असे सदर छापून आले आहे. प्रहार पेपरच्या पहिल्या पानावर हा मथळा छापण्यात आला आहे. तेव्हा उद्याच्या अंकात ‘हार आणि प्रहार’ या शिर्षकाखाली नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला करणार असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.