शिवजयंती : राज्यपाल कोश्यारी यांचे शिवरायांना अभिवादन

शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, उपमहापौर सुहास वाडकर, मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, किसन जाधव, माजी महापौर महादेव देवळेकर, श्रद्धा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी सहभागी झाले. यावेळी संगीत कला अकादमीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

राज्यपालांचे संगीत कला अकादमीला 25 हजार रु. बक्षिस..

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी सुरेल गीतांनी प्रभावित राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी अकादमीला 25 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.