- 283 रुग्णांची नोंद – उपचाराधीन रुग्ण 2705
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2705 इतकी झाली आहे. आज दिवसभरामध्ये 283 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत 1 लाख 2 हजार 698 जणांना करोनाची लागण झाली.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 281 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 2 रुग्णांची आज नोंद झाली. शहरातील रुग्णसंख्या वाढली असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. आज दिवसभरामध्ये एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर आजपर्यंत 2599 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1827 तर शहराबाहेरील 771 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 30 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 98 हजार 165 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1559 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 934 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 879 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1826 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2405 इतकी आहे.