नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करत दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटू आणि काही पोलिसांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाली.
#WATCH | “We’re in need of the support of the whole country, everyone must come to Delhi. Police using force against us, abusing women and doing nothing against Brijbhushan…”: Wrestler Bajrang Punia pic.twitter.com/krGrO7HlxM
— ANI (@ANI) May 3, 2023
पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.या मुद्द्यावर वृत्तमाध्यमांशी बोलताना बजरंग पुनिया म्हणाले की, हा प्रकार घडला आहे. ही खूप वाईट वेळ आहे. ज्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे,पोलिसांनी त्यांना काहीच केले नाही. तिथल्या खेळाडूंसोबत कसं वागलं जातं ते तुम्ही पाहत आहात.
ते म्हणाला गुन्हेगार कोण? ब्रिजभूषण शरण सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आमचा सन्मान न केल्यास आम्ही आमचे पदक भारत सरकारला परत करू, असे ते म्हणाले. मला असा आदर नको आहे. या देशात कायदा नावाची गोष्ट नाही का? वृत्तमाध्यमांशी बोलताना बजरंग पुनिया भावूक झाला.
आंदोलन करणाऱ्या बजरंग पुनियाने सांगितले की, ‘दिल्लीत संततधार पाऊस पडत असल्याने आपण बेड आणले होते. याला पोलिसांनी आक्षेप घेतल्याने यावरून बाचाबाची सुरू झाली. रिपोर्टनुसार, आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी कुस्तीपटूंसाठी खाटांची व्यवस्था केली होती. यासाठी दिल्ली पोलिसांनी सोमनाथ भारतीला ताब्यात घेतले आहे.’
त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना मारहाण केले नसल्याचे सांगितले आहे. एका अधिकृत निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, “जंतरमंतरवर धरणे सुरू असताना, आप नेते सोमनाथ भारती खाट घेऊन परवानगीशिवाय धरणे स्थळी आले. मध्यस्थी केल्यावर, समर्थक ट्रकमधून पलंग काढण्याचा प्रयत्न करत आक्रमक झाले. त्यानंतर किरकोळ भांडण झाले. सोमनाथ भारती यांच्यासह २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.’