दिल्ली-मुंबई एक्‍स्प्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट

नवी दिल्ली : मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020 -2021 चा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला. दरम्यान, सर्वसामान्यांनांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्व सामान्यांना जे हवे आहे ते या अर्थसंकल्पातून देण्यात येणार असल्याचे, अर्थमंत्र्यांनी सांगितले. सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे पूर्वीपासून उदिष्ट राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान, उद्योगांसाठी 27 हजार 300 कोटींची तरतूद, पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच, दिल्ली-मुंबई एक्‍स्प्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उदिष्ट्य आहे. देशभरात 9 हजार किलोमीटरपर्यंत ‘इकोनॉमि कॉरिडॉर’ उभारण्यात येणार आहे. भाजप सरकार 2000 किलोमीटरपर्यंतचे किनारी रस्ते तयार करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसंच, 550 रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा उपलब्ध करु देणार आहे. तेजस एक्‍स्प्रेससारख्या गाड्या सुरु करणार या रेल्वे पर्यटन केंद्राला जोडण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी सकार प्रयत्न करणार, असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.