नवी दिल्ली – प्रत्येक देशातील सरकार दरवर्षी आपला अर्थसंकल्प सादर करत असते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. १) भारताचा अर्थसंकल्प सादर करीत आहे. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प म्हंटल कि चटकन आपल्या डोळ्यांसमोर अर्थमंत्र्याच्या हातातील ब्रिफकेस येते. ब्रिटिश काळापासून या ब्रिफकेसची परंपरा चालत आली आहे. मात्र, मागील वर्षीपासून (२०१९) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढत लाल रंगाच्या चोपडीतून अर्थसंकल्प आणण्यास सुरवात केली.
Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman and her team to meet President Ram Nath Kovind, ahead of presentation of Budget https://t.co/UOWNDjqVSo
— ANI (@ANI) February 1, 2020
पहिल्यांदा त्यांच्या हातात लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आणलेला अर्थसंकल्प बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. या वर्षी देखील सीतारामन यांनी लाल रंगाच्या चोपडीतूनच अर्थसंकल्प आणला आहे.
Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman calls on President Ram Nath Kovind before presenting the Union Budget 2020-21 pic.twitter.com/zwwp2TTIzj
— ANI (@ANI) February 1, 2020