मुंबई – अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले आहेत. ही आनंदाची बातमी ऐकून कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त चाहतेही खूप खूश आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने मुलीला जन्म दिला आहे. आलियाला आज सकाळी ८.२० वाजता दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आलिया भट्टने 12.05 मिनिटांनी मुलीला जन्म दिला. यावेळी रणबीर कपूरही रुग्णालयात उपस्थित होता. वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार मुलीला जन्म दिल्याबद्दल सांगितले.
लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच आलियाने गरोदरपणाची बातमी दिली होती. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. अभिनेत्रीने सोनोग्राफीचा फोटो शेअर केला होता. तिचे प्रेग्नेंसी लूक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये आलिया तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद लुटताना दिसत आहे.