पिंपरी, दि. 11 (प्रतिनिधी) – दैनिक प्रभात आणि वकिलांमध्ये वर्षानुवर्षे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. गेली अनेक वर्षे हा स्नेह आपण जपत आलो असून हा स्नेह अधिक वृद्धींगत व्हावा, असे मत नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ यांनी व्यक्त केले. निमित्त होते नव्याने निवडून आलेल्या पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या सदस्यांची दैनिक प्रभातच्या पिंपरी विभागीय कार्यालयाला दिलेली सदिच्छा भेट.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ, उपाध्यक्षा ऍड. जयश्री कुटे, सचिव ऍड. गणेश शिंदे, महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे, सहसचिव ऍड. मंगेश नढे, खजिनदार ऍड. विश्वेश्वर काळजे, हिशोब तपासणीस ऍड. राजेश रणपिसे, सदस्य ऍड. अक्षय केदार, ऍड. स्वप्नील वाळुंज, ऍड. सौरभ जगताप, ऍड. नितीन पवार, ऍड. प्रशांत बचुटे, ऍड. पवन गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ म्हणाले, मी 40 वर्षांपासून दैनिक प्रभातचा नियमित वाचक आहे. या काळात प्रभातची बदलती रूपे मी जवळून पाहिली आहेत. प्रभातने नेहमीच लोकहिताचा आदर करत नाविण्यपूर्ण बदल केले आहेत. आगामी काळात दैनिक प्रभात सोबत मिळून आम्ही विविध प्रश्नांवर काम करू. प्रसिद्धीसाठी बातमी नको, त्यात सामाजिक भावना असणे महत्वाचे आहे. ते भान दैनिक प्रभातने नेहमीच जपल्याचेही रसाळ म्हणाले.
उपाध्यक्षा ऍड. जयश्री कुटे, सचिव ऍड. गणेश शिंदे, महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे, सह सचिव ऍड. मंगेश नढे, हिशोब तपासणीस ऍड. राजेश रणपिसे, सदस्य ऍड. स्वप्नील वाळुंज, ऍड. पवन गायकवाड आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या जुन्या-नव्या लोकांचा दैनिक प्रभातशी कायम संबंध राहिला आहे. विविध उपक्रमांमध्ये वकील मंडळींचा सहभाग असतो. आपल्या तत्पर सेवेसाठी प्रभात हे दैनिक वकील मंडळींमध्ये ओळखले जाते. लोकहितासाठी सोबत काम करू, अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.
व्यवस्थापक सीए. रवी इंडी यांनी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे आभार मानले.
वकील बांधवांशी मैत्रीपूर्ण नाते – स्वामी
दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी म्हणाले, पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये वरिष्ठांसह नवोदितांना देखील काम करण्याची संधी मिळाली असून ही आनंदाची बाब आहे. दैनिक प्रभात आणि वकील बांधवांचे नाते कायमस्वरुपी मैत्रीपूर्ण रहावे यासाठी आमचा प्रयत्न असतो. दैनिक प्रभात हे सर्वसामान्य नागरिकांसाठी चालवले जात असलेले दैनिक आहे. लोकहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी दैनिक प्रभातचा कायम पुढाकार असतो.