बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या मते, सध्या विश्रांती घेण्याचा आणि स्वत:चा विकास करण्याचा हा एक चांगला काळ असून लॉकडाऊनमध्येही त्याने आपल्या कामापासून पूर्ण आराम घेतला नाही. तो म्हणतो की, सध्या त्याला काही चांगल्या स्क्रिप्ट वाचण्यात मजा येत आहे.
संजय दत्तचा “पानीपत’ हा चित्रपटात अखेर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर लॉकडाऊनमुळे “सडक 2’सह आणखी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या कोणती नवीन स्क्रिप्ट वाचण्यात व्यस्त आहे, असे विचारले असता संजय म्हणाला, माझ्याकडे बऱ्याच पटकथा आहेत, ज्या मी सध्या वाचत आहे. लॉकडाऊनमुळे बऱ्याच तारखा बदलल्या आहेत. ज्या चित्रपटांचे चित्रीकरण होणार होते तेदेखील पुढे ढकलले गेले आहेत.
तसेच अनेक चित्रपटांवर चर्चा सुरू आहे. माझ्याकडे काही खूप चांगल्या स्क्रिप्ट्स आहेत. परंतु याबाबत सर्व काही सुधारल्यानंतरच मी त्याबद्दल सांगू शकेन.
सध्या संजय हा मोकळा वेळ स्वत:चा विकास करण्यासाठी वापरत आहे. तो म्हणाला, जेव्हा आम्ही सेटवर असतो तेव्हा आम्ही सतत काम करत असतो. अशा परिस्थितीत मला असे वाटते की शरीराला अधिक चांगले काम करण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता आहे.
म्हणून, माझा असा विश्वास आहे की आपला स्वत:चा विकास तसेच विश्रांतीसाठी या काळाचा सदुपयोग केला पाहिजे. मी दररोज माझ्या मुलांच्या संपर्कात आहे. कारण मला त्यांना पाहण्याची आवड आहे आणि दिवसभर मला उत्साही वाटते, असे त्याने सांगितले.