सातारा – जिल्ह्यातील चौघांचा करोना रिपार्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी गुरूवारी रात्री आठ वाजता दिली. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेले कलेढोण (ता. खटाव) येथील एक 45 वर्षीय महिला, कुंभारगाव (ता. पाटण) येथील 70 वर्षीय पुरुष, म्हावशी (ता. पाटण) येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज (ता. कराड) येथील 40 वर्षीय पुरुष अशा एकूण चार जणांचा अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 185 झाली आहे.