हर्षदा काकडे
शेवगाव – चांगले विचार आणि चांगली माणसे ही संस्थेची खरी संपत्ती आहे. नोकरी करताना सचोटी, प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता हे फार महत्वाचे असते आणि ते जपण्याचे काम विष्णुपंत लवांडे यांनी आपल्या कार्यकाळात केल्याचे प्रतिपादन माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी केले.
मंगरूळ येथे निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रमशाळेचे कर्मचारी विष्णू लवांडे यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. विद्याधर काकडे होते. वेळी सरपंच संजय काकडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, नवनाथ बिटाळ, रामकिसन सांगळे यांच्यासह लवांडे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ उपस्थित होते.ॲड काकडे, अॅड.संजय काकडे, मुख्याध्यापक प्रभाकर उबाळे यांची भाषणे झाली. अनिल जगताप यांनी प्रास्ताविक केले. जयश्री लवांडे यांनी सूत्रसंचलन केले. ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी आभार मानले.