प्रवाशांसाठी खुशखबर; पीएमपी बसचा प्रवास फक्त 10 रुपयांत

पुणे : पुणे महानगरे पालिकेचे अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. 7 हजार 390 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मुख्यसभेत मांडले. पीएमपी बसचा प्रवास, प्रवाशांना दिवसभरासाठी 10 रुपयांत करता येणार आहे. ही नवी घोषणा करताना मला विशेष आनंद होत असल्याचे दाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. मध्य पुण्यातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. अशा भागात पीएमपीच्या मध्यम आकाराच्या (मीडियम-मिडी) गाड्या भाडेतत्त्वावर आणल्या जातील. या गाड्यांची आसनक्षमता ३२ असणार आहे.

डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंज पेठ मार्गे) या मार्गांसह
स्वारगेट-टिळक रस्ता-खजिना विहीर-अप्पा बळवंत चौक-पुणे स्टेशन मार्गे पूलगेट हा वर्तुळाकार मार्ग या
गाड्यांसाठी प्रस्तावित आहे. या चारही मार्गांवर एका तिकिटाचा दर दिवसभरासाठी दहा रुपये राहणार आहे.
याबरोबरच भाडेतत्त्वावरील बस आणि सातशे ई-बस, तसेच ४४० सीएनजी बसचा समावेश करून पीएमपीच्या
ताफ्यात ३०४१ बस उपलब्ध करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

नानाजी देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निवास व्यवस्था यावर्षी सुरू होणार 

नानाजी देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रूग्ण नातेवाईक निवास व्यवस्था हा प्रकल्प येत्या वर्षात सुरू केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. हृदयविकार, कर्करोग, किडणी,मज्जातंतूशी संबंधित आजार आणि शस्त्रक्रियेसाठी सुपरस्पेशालिटी सुविधांची आवश्यकता असते. सध्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या एकाही रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पुणे शहरात महापालिकेच्या दहा हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर नानाजी देशमुख सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाइकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वित्त किंवा हॉस्पिटल उभारणी क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असाणाऱ्या संस्थांकडून अत्यल्प व्याज दरात अर्थसहाय्य उपलब्ध करून प्रकल्प उभारणी आणि खासगी भागीदारीतून लोकसहभाग (पीपीपी) तत्त्वावर ही योजना राबविण्याचे महानगर पालिकेचे नियोजन आहे.

कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारण्याचे काम सुरू

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारण्याचे काम सुरू आहे. त्याबरोबर दळवी हॉस्पिटल, सोनावणे हॉस्पिटल आणि नायडू हॉस्पिटलमध्ये ‘पीपीपी तत्त्वावर अतिदक्षता विभाग चालविण्यात येणार आहे. बालकांसाठी हृदयरोग निदान आणि उपचार सुविधा, स्व. मधुकर बिडकर रक्तपेढी, महिलांसाठी कर्करोग निदान, आरोग्य योजनांसाठी स्मार्ट हेल्थ कार्ड, मुकुंदराव लेले दवाखान्यात पॅथॉलॉजी लॅब, औषध वितरण व्यवस्थेसाठी सॉफ्टवेअरचे विकसन,स्मार्ट स्मन्नामाडांची उभारणी या योजनांही प्रस्तावित आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.