नवी दिल्ली – दिल्लीत गेल्या दोन दिवसात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याची माहिती आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, हिंसाग्रस्त उत्तर पूर्व दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बुधवारी बंद राहतील. बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सिसोदिया यांनी सीबीएसईला बुधवारी होणारी बोर्ड परीक्षा तहकूब करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.