मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेनने 2020मध्ये “आर्या’ या वेब सीरीजमधून यशस्वीपणे पर्दापण केले होते. या सीरीजला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच या सीरीजच्या सीक्वलची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता आर्या सीरीज आणि सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
सुष्मिता सेनने “आर्या’च्या दुस-या सीजनची घोषणा केली आहे. सुष्मिताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत “आर्या’चा सीक्वल येणार असल्याची चाहत्यांना माहिती दिली. या फोटोत सुष्मिताचे फक्त डोळे दिसत आहेत. या फोटोसह तिने पोस्ट केले की, मी एक वादळ येताना पाहत आहे. “आर्या सीजन 2’वरील आपले प्रेम हेच आमच्यासाठी सर्वकाही आहे. मित्रांनो, मी आपणा सर्वांवर खूप प्रेम करते.’
सुष्मिताने या सीक्वलची घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. असंख्य चाहत्यांनी सुष्मिताचे फोटो रि-पोस्टही केले आहेत. “आर्या’मधून सुष्मिताने डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू केले होते. विशेष म्हणजे, या वेब सीरिजसाठी सुष्मिताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेयर ओटीटी अवॉर्डने गौरविण्यात आले होते.
दरम्यान, ही सीरीज जून-2020मध्ये 9 भागात रिलीज करण्यात आली होती. या सीरीजमध्ये सुष्मिता सेनसह चंद्रचूड सिंह, नमित दास, सिकंदर खेर, अंकुर भाटिया, मनीष चौधरी, विश्वजीत प्रधान आदी कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.