साेनमर्ग फेब्रुवारीत पहिल्यांदाच खुले

बर्फाने अंथरलेली शिखरे पर्यटकांना आकर्षित करू लागली

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ साेनमर्ग गुरुवारी पहिल्यांदा फेब्रुवारीत खुले करण्यात आले. बर्फाने अंथरलेली शिखरे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. त्यामुळेच पहिल्याच दिवशी एक हजारावर पर्यटक साेनमर्गला पाेहाेचले. साेनमर्गचे जिल्हा विकास आयुक्त शफाकत इक्बाल म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला प्राेत्साहन देण्यासाठी साेनमर्ग यंदा नियाेजित वेळेआधीच सुरू झाले. या ठिकाणी पाेहाेचण्यासाठी बीआरआे या सरहद्द सैनिक व पर्यटन विभागाने संयुक्त माेहीम सुरू केली. रस्त्यावरील बर्फ हटवण्यात आला. साेबतच वीज, पाणी व इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या कामात स्थानिक लाेकांनी व्यापक सहकार्य केले. त्यामुळेच आम्ही पुरेशी तयारी करण्यात यशस्वी राहिलाे आणि त्यास पर्यटकांसाठी सुरू केले आहे. दुसरीकडे रिसाॅर्ट मालक म्हणाले, साेनमर्ग गेल्या १४ मार्चला खुले झाले हाेते. तेव्हा पहिल्या दिवशी सुमारे १०० पर्यटकांनी भेट दिली हाेती. त्यापैकी बहुतांश परिसरातील हाेते. परंतु यंदा एका आठवड्यात १० हजार पर्यटक या ठिकाणाला भेट देणे अपेक्षित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.