मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. त्यावरून त्यांना टार्गेट करण्यात येत असल्याचे दिसत आहे. कारण त्यांचे मॉर्फ केलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. चित्रा वाघ यांच्यासोबत संजय राठोड यांचा मॉर्फ केलेला फोटो विकृतांनी सोशल मीडियावर टाकला आहे. या प्रकरणी आता चित्रा वाघ यांनी पोलिसांत धाव घेतली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर हे दोन फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये संजय राठोड आणि चित्रा वाघ यांचा मॉर्फ केलेला फोटो विकृतांकडून व्हायरल केला जात आहे. मॉर्फ म्हणजे खोटा फोटो. तर दुसरा फोटो चित्रा वाघ आणि त्यांच्या पतीसोबतचा खरा फोटो आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील मॉर्फ केलेल्या फोटोंवर विश्वास ठेवू नका आणि तसे फोटो व्हायरल केल्यास तो सायबर गुन्हा समजला जातो.
व्हायरल झालेले फोटो हे चित्रा वाघ यांनी स्वतः माध्यमांपर्यंत पोहोचवले आहेत. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी आणि समाजमाध्यमांवरील हे फोटो लवकरात लवकर हटवावे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. हा फोटो सर्वच समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवर म्हणाले, अशा विकृतांवर कडक कारवाई गेली पाहिजे. कोर्टाने देखील याची दखल घेतली आहे. एखादी महिला दुसऱ्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर हा अवमान आहे.
महाराष्ट्र में न्याय केलिए आवाज उठाना क्या जुर्म है……
कानून मंत्री@Ravishakarprashad ji और सूचना एंव प्रसारण मंत्री @prakashJawdekar jiसे निवेदन है कि इस तरीके का काम करने वाले अपराधियों को कड़ी सजा मिले @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @MahaCyber1 @AnilDeshmukhNCP https://t.co/B4I4PXUXxj
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 26, 2021
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि हा तपास एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला सोपवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासचालकांकडे केली आहे. आमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे पुणे पोलिसांनी दिलेले नाहीत. सगळे पुरावे असतानाही पोलीस आणि सरकार कुणाचा वाट पाहते आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.