बॉलीवूडमध्ये अनेक विवाहित नायिकांबरोबरच प्रियांका चोप्राच्या वैवाहिक आयुष्याचीही चर्चा होत असते. विशेषतः प्रियांका आई बनणार असल्याच्या अफवा अधूनमधून उठत असतात. पण आता प्रियांकाची छोटी जाऊ सोफी टर्नर ही आई बनणार असल्याचे समोर आले आहे.
निक जोनसच्या छोट्या भावाची बायको असणारी सोफी हीदेखील हॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 23 वर्षाच्या या हॉलीवूड ललनेने गतवर्षी लास वेगासमध्ये जो जोनस याच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर लगेचच या दोघांनी लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंग सुरू केल्याच्या चर्चा हॉलीवूडमध्ये होत होत्या. त्यामुळेच जो जोनसला सोफीकडील ही गुड न्यूज लवकर शेअर करायची नव्हती.
पण अशा गोष्टी फार काळ लपून राहात नाहीत आणि हॉलीवूड-बॉलीवूडसारख्या ग्लॅमरस आणि सदैव मीडियाचे लक्ष लागून राहिलेल्या क्षेत्रात तर त्याची सूतराम शक्यता नसते. त्यामुळेच सोफीकडील ही गोड बातमी समोर आलीच; पण म्हणजे सोफीने तिच्या वॉर्डरोबमध्ये मॅटर्निटीसाठी काही खास कपडेही आणून ठेवले आहेत! आता बोला ! तिच्या वॉर्डरोबमधील गोष्टींविषयीची माहिती समोर येत असेल, तर प्रेग्नेन्सीची न्यूज कशी लपून राहील?