पुणे- पुणे जिल्ह्यात 24 तासात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही आहे. प्रशासनाच्या सुचना कोरोनाची पाळल्यामुळे परिस्थिती आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे.
राज्यात सगळ्यात पहिला कोरोना पाॅसिटीव्ह रुग्ण पुण्यात आढळला होता. पुणे पालिकेने सगळ्या स्तरावर काळजी घेण्यास सुरुवात केली होती. शहरात निर्जंतुकीकरण, घरात राहण्याचे आवाहन एवढंच नाही तर सगळ्या कंपन्यांना वर्क फ्राॅम होम करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, जमाव बंदी आणि संचारबंदी लागू केली होती. त्यासाठी वेळोवेळी जनतेला घराबाहेर निघू नका, असं आवाहनही केलं होतं. पुणेकरांनी त्या सुचनांचं पालन केलं त्यामुळे गेल्या 24 तासात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.