खुशखबर.! तारक मेहतामध्ये लवकरच परतणार दया बेन; पण दिशाऐवजी असेल ‘ही’ अभिनेत्री

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका “तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.

जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दरम्यान, तारक मेहता मालिकेतील आणखील एक लोकप्रिय पात्र म्हणजे ‘दयाबेन’ अभिनेत्री दिशा वकानीने ही महत्वाची भूमिका साकारली आहे.

पण गेल्या काही वर्षापासून दिशा वकानी या मालिकेतून गायब झाली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. चाहते तिला मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दयाबेन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये लवकरच कमबॅक करणार आहे.

मात्र,  ही व्यक्तिरेखा आता दिशा वकानी ऐवजी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी  साकारणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. अलिकडेच झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिव्यांकानं तारक मेहताची ऑफर मिळाल्याचं मान्य केलं. 

सुरुवातीला तिनं ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता. पण आता ती या भूमिकेबद्दल विचार करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे.

28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल 13 वर्ष ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.