महाराष्ट्राच्या तेजसला सुवर्ण, कोमलला रौप्य

हनमकोंडा – जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद ऍथलेटिक्‍स स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिर्से आणि कोमल जगदाळे यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.

पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजसने 14.09 सेकंद वेळ नोंदवताना सुवर्ण पटकावले. सचिन बिहूने (14.22) दुसरा, तर तरुणदीप सिंग भाटियाने (14.23) तिसरा क्रमांक मिळवला.

महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत रेल्वेच्या पारुल चौधरीने 9:51.01 मिनिटांत निर्धारित अंतर गाठताना सुवर्णावर नाव कोरले. कोमलने 9:51.03 अशी वेळ नोंदवल्याने तिचे सुवर्णपदक थोडक्‍यात हुकले. रेल्वेच्या प्रीती लांबाने 10:22.05 वेळेसह कांस्यपदक जिंकले.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीतसुद्धा पारुलने कोमलवर सरशी साधूनच सुवर्ण मिळवले होते. पारुलची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसुद्धा ठरली. दरम्यानन, रेल्वेच्या बी ऐश्‍वर्याने महिलांच्या उंच उडी प्रकारात 6.52 मीटर इतकी झेप घेऊन यंदाच्या स्पर्धेतील विक्रम नोंदविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.