नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 35 रुपयांनी कमी होऊन 51,697 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीचा दर 295 रुपयांनी वाढून 66,752 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सकाळच्या सत्रामध्ये रुपयाचा दर वाढला होता. त्याचाही सोन्याच्या दरावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,931 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिर होता. जागतिक बाजारात चांदीचा दर वाढून 24.65 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.