नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली. सोन्याचा दर 34 रुपयांनी कमी होऊन 50,905 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 760 रुपयांनी वाढून 57,974 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,723 डॉलर व चांदीचा दर 10.80 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, महिन्याच्या अखेरीस अमेरिकेच्या व्याज दरवाढीची घोषणा होणार आहे.
नेमकी किती व्याजदर वाढ होईल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यानंतर विविध बाजारात काही प्रमाणात स्थिरता येण्यास मदत होणार आहे.