नवी दिल्ली- जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याच्या दरात 115 रुपयांची घट होऊन सोन्याचा दर 50,983 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 214 रुपयांनी वाढून 61,569 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, वायदे बाजारात ज्या प्रमाणात सोने आणि चांदीचे दर होते त्याप्रमाणे स्पॉट मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार झाले. चलन बाजारात रुपयाचा दर वाढल्यामुळेही सोन्याच्या दरावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. व्याजदर वाढ आणि युद्धामुळे आगामी काळात सोन्याचे दर चढे राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली