नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये आज तेजी पाहायला मिळते आहे. अनेक दिवसांच्या घसरणीनंतर आज या मौल्यवान धातूंचे दर किरकोळ वाढले आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी एप्रिलच्या सोन्याची वायदे किंमत 239.00 रुपयांनी वाढून 48,078.00 रुपयांवर पोहोचली आहे. तर मार्चच्या चांदीची वायदे किंमत 321.00 रुपयांच्या तेजीमुळे 70,405.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्यामध्ये तेजी जारी आहे. मंगळवारी अमेरिकेमध्ये सोन्याचे दर 12.32 डॉलरने वाढून 1,842.28 डॉलर प्रति औंस झाले होते. तर चांदीचे दर 0.28 डॉलरने वाढून 27.54 डॉलर या स्तरावर पोहोचले आहेत.
दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर 94 रुपयांनी वाढले होते. यानंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,877 रुपये प्रति तोळा झाले होते. तर सोमवारी चांदी देखील महागली होती. चांदीचे भाव काल 340 रुपयांनी वाढून 68,391 रुपये प्रति किलो झाले होते.
Prithvi Finmart चे डायरेक्टर मनोज जैन यांच्या मते, सोन्याचांदीच्या दरात अशाप्रकार चढउतार चालूच राहणार आहे. मनीकंट्रोलशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर 1858 डॉलर आणि चांदीचे दर 28.55 डॉलर या स्तरावर पोहोचू शकतात.