मुंबई / पालघर – सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील कपासे ठाकूर पाडा येथे आरोपीने आपल्या पत्नीसह तिच्या साडूचे अनैतिक संबंधातून हत्या केली असून सफाळे पोलिसांकडून आरोपीला काही तासाच अटक करण्यात यश मिळविले आहे. या घटनेमुळे पालघर येथील सफाळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप ठाकूरची पत्नी संगीता आणि साडू पांडू श्रवणे यांचे एकमेकांशी अनैतिक संबंध होते. दिलीप ठाकूर असं या शेतमजुराचं नाव आहे. रविवारी नेहमीप्रमाणे दिलीप शेतीच्या कामासाठी गेला होता. पण, काम लवकर संपल्याने तो घरी परतला. तेव्हा त्याला घरी संगीता आणि पांडू यांना आक्षेपार्ह अवस्थेत झोपल्याचे दिसून आले.त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने घरातील कुऱ्हाडीने त्या दोघांची हत्या केली.काही तासातच आरोपीला पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि कहाळे करीत आहेत.