मुंबई : शेतकरी आंदोलनावरून मागच्या काही दिवसांपासून हॉलिवूड आणि बॉलीवूडच्या सेलिब्रेटीने केलेल्या ट्विटवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता ‘भारतरत्नां’ची चौकशी करण्याचे आदेश मागे घ्यावेत आणि सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या संबंधी त्यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे.
#काँग्रेसच्या भाषेमध्ये परदेशी षडयंत्रकारीचे समर्थन ट्वीट करणाऱ्या सेलिब्रिटीची चौकशी कधी करणार?आणि भारत रत्नांच्या @mangeshkarlata @sachin_rt @akshaykumar @SunielVShetty यांच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावे @AnilDeshmukhNCP@OfficeofUT#IndiaAgainstPropoganda #IndiaStandsTogether pic.twitter.com/xy0c2wwjb3
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 9, 2021
राम कदम यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, काँग्रेसची भाषा बोलणारे सेलिब्रिटीची सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, हृतिक रोशन, स्वरा भास्कर, अली फजल, रवीश कुमार, हार्दिक पटेल अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींत्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी राम कदम यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटजनी ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिले होते. या सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.