नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी झाले. त्यामुळे भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 1037 रुपयांनी कमी होऊन 66,128 रुपये प्रति किलो झाला. त्याचबरोबर सोन्याचा दर 312 रुपयांनी कमी होऊन 46,907 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1810 डॉलर तर चांदीचा दर 25.37 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला. भारतात आगामी काळात उत्सव येणार आहेत. त्याचबरोबर लग्नाच्या तिथी येत आहेत. त्यामुळे सध्याच्या कमी भावावर भारतात बरेच ग्राहक सोन्याची खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.