Gold-Silver Price : सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुम्ही सोनेचांदीच्या नव्या किंमती जाणून घ्या. आज सोने 63,000 रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदी 79,000 रुपये प्रति किलोच्या वर विकले जात आहे.
प्रत्येक राज्यात त्यांच्या किमतींमध्ये थोडा चढ-उतार होऊ शकतो. अशा स्थितीत सोन्यामध्ये 200 रुपयांची तर चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. सोने अनेक कॅरेटमध्ये येते. त्यामुळे त्याच्या किमतीही बदलतात. 22 कॅरेट सोन्याचा भाव 58000 ते 59000 रुपयांच्या दरम्यान आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,030 रुपये प्रति 10 ग्रॅम ते 63000 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकला जात आहे.
मुंबई- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57750 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 63000 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे – 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 57750, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 63000 रुपये असेल.
नागपूर – 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम 57750 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 63000 रुपये इतका असेल.
नाशिक- 20 कॅरेट सोन्याचा दर 57750 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 6300 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
सोने खरेदी करताना, त्याची शुद्धता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) हॉलमार्कमधून तपासली जाऊ शकते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट 958, 22 कॅरेट 916 आणि 18 कॅरेट 750 ने चिन्हांकित केले जातात. दागिने पाहून तुम्ही त्याची शुद्धता कळू शकते. तसेच सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. यावर तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता.