Gold-Silver Rate Today| येत्या काही दिवसांवर गुढीपाडवा हा सण आला आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या या सणानिमित्त ग्राहकांचा सोने-चांदी खरेदीसाठी मोठा कल असतो. मात्र गुढीपाडव्या पूर्वीच सोन्याचा दरात विक्रमी वाढ झाली आहे.
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने नवा उच्चांक स्थापित करत ७० हजार रुपयांच्या पातळीजवळ पोहोचले आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे घाऊक दर बुधवारी १० ग्रॅम ६९,८७० रुपयांवर गेले. मंगळवारच्या तुलनेत त्यात ७६० रुपयांची वाढ झाली.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,८९० इतकी आहे. मागील ट्रेडमध्ये सोन्याची किंमत ६९,४२० रुपये प्रति १० ग्रॅमवर होती. तर चांदी ७९,६२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. अलीकडच्या काळात सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमती Gold-Silver Rate Today|
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६३,९५६ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६९,७७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६३,९५६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर ६३,९५६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७० रुपये इतका आहे.
नाशिक
२२कॅरेट सोन्याचा दर ६३,९५६ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७० रुपये आहे.
हेही वाचा:
Pune: तरतूद आणि गरज असतानाही आरोग्यसेवेवर खर्च नाही